फ्रॅंकींगसाठी फरफट; मुद्रांक विभाग, बॅंकांच्या टोलवाटोलवीने नागरिक त्रस्त

फ्रॅंकींगसाठी फरफट; मुद्रांक विभाग, बॅंकांच्या टोलवाटोलवीने नागरिक त्रस्त

ठाणे : दस्त नोंदणी करण्यासाठी फ्रॅंकींगच्या सुविधेचा वापर केला जातो. मात्र, मुद्रांक विभाग आणि बँकांच्या दुर्लक्षामुळे फ्रॅंकींग करणाऱ्या कोकण विभागातील बॅंकांची संख्या घटली आहे. मुद्रांक विभागाच्या लेखी कोकण विभागात फ्रॅंकींग करणाऱ्या 22 बँका असून ठाणे शहरात केवळ दोनच बँकामधे ही सेवा उपलब्ध आहे.याबाबत बँक व मुद्रांक विभागाकडे तक्रारी केल्यास केवळ टोलवाटोलवी केली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. दरम्यान, भविष्यात सर्वच व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने फ्रॅंकींगची यंत्रे जमा करून घेण्याचा मानस मुद्रांक विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

मुद्रांक घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्यानंतर,सरकारने बॅंकांमार्फत फ्रॅंकीग पद्धत सुरू केली. मात्र,गेल्या 15 वर्षांमध्ये फ्रॅंकीग पद्धत रुढ झालेली नाही. मुद्रांक विभागाने नियमांमध्ये लवचिकपणा न ठेवल्यामुळे अनेक बॅंकांनी फ्रॅंकीग सेवाच बंद केली आहे. यापूर्वी ठाणे शहरात ठाणे जनता सहकारी बॅंक, आयसीआयसीआय बॅंकांकडून सेवा दिली जात होती.मुद्रांक विभागाच्या नियमानुसार प्रत्येक बॅकेला दरवर्षी परवाना घ्यावा लागतो. परंतु, जलद मंजुरी मिळत नसल्यामुळे ठाण्यात केवळ ठाणे भारत सहकारी बँक आणि कोपरीतील नवजीवन बँक या दोन बॅंकांकडून फ्रॅंकींग सेवा सुरू आहे.त्यामुळे,या बँकामध्ये ग्राहकांच्या रांगा लागत असून, अनेकांना फ्रॅंकींगअभावी माघारी परतावे लागते.

मुद्रांक विभागाच्या नियमानुसार, बॅकांना आगाऊ रक्कम जमा करुन फ्रॅंकीग घ्यावे लागते. मात्र, काही वेळा भरलेल्या रक्कमेचे फ्रॅंकींग न झाल्यास पैसे लॅप्स होण्याची भीती आहे.त्यामुळे बॅंकांकडून दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. फ्रॅंकींगचे पैसै संपल्यानंतर पुन्हा मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. या कार्यालयाकडून 300 व 500 फ्रॅंकींगसाठी कोड घेतले जाते. मात्र, ते कोड तातडीने दिले जात नसल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे. तर बॅंकांकडून कमी रक्कमेचे फ्रॅंकींग घेतले जात असल्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागत असल्याचे मुद्रांक विभागाचे म्हणणे आहे.या गोंधळात नागरिकांच मात्र,हाल होत आहेत.

कोकण विभागात 22 मात्र, सिंधुदुर्गात एकाही बॅंकेत फ्रॅंकीग नाही  
कोकण विभागात 22 बॅंकांमध्ये फ्रॅंकीग सेवा उपलब्ध सेवा आहे. मात्र,पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाही बॅंकेत फ्रॅंकीग सेवा उपलब्ध नाही.त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना तातडीच्या सेवेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बॅंकांमध्ये धाव घ्यावी लागते.अनेकदा यासाठी एजंटला जादा कमिशन देऊन काम उरकले जाते.अवाढव्य ठाणे शहरात केवळ दोनच बँकामध्ये ही सेवा आहे. 

दरवर्षी बॅकांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सेवेसाठी परवाना दिला जातो. मात्र, यंदा फेब्रुवारी सुरू होवूनही काही बॅंकांच्या परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. मुद्रांक विभागाकडून एका फ्रॅंकींगमागे 12 ते 15 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे.मात्र, ही आकारणी कमी असल्यामुळे बड्या सरकारी बॅंका व खासगी बॅंकांकडून फ्रॅंकींगला नकार दिला जातो. फ्रॅंकींग पद्धतीमधून मुद्रांक विभागाकडून आगाऊ पैसे घेतले जातात.त्यासाठी एखाद्या बड्या वित्तसंस्थेला फ्रॅंकीगची परवानगी द्यायला हवी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांचे दस्त नोंदणी करण्यासाठी शासनाने आता आधुनिकतेची कास धरली असून बँकाकडील फ्रॅंकींग मशीन जमा केल्या जात आहेत.नागरिकांना,ई-पेमेंटद्वारे ग्रास प्रणालीमार्फत मुद्रांक शुल्क भरता येणार आहेत.दरम्यान,बँकाच्या फ्रॅंकींगबाबत आक्षेप असले तरी,पूर्वी 1 ते 3 टक्के असणारे कमिशन आता 0.5 टक्यावर आल्याने यात बँकाकी संख्या रोडावली असावी.
- सुनील जोशी, वरिष्ठ अधिकारी, मुद्रांक व नोंदणी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com