Cyber Crime
esakal
मुंबई : मुंबईतील एका वृद्ध व्यावसायिकाला आभासी अटकेत ठेवून सीबीआय, ईडी कारवाईची भीती घालत सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाणे आणि सायबर विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी फसवणुकीची घटना ठरली आहे. यापूर्वी आभासी अटकेद्वारे मुंबईत २० कोटी, तर दिल्लीत २३ कोटी उकळण्यात आले होते.