शेअर विकले, कर्ज घेतले... ४० लाख उकळल्यानंतर घरही विकणार होते; डिजिटल अरेस्ट प्रकरणात भांडुपचे कुटुंब थोडक्यात वाचले

Mumbai Digital Arrest: दहशतवादी कृतीत सहभाग निष्पन्न झाल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी भांडुप येथे राहणाऱ्या एका कुटुंबाकडून ४० लाख उकळले.
 Fraud Case

Fraud Case

sakal 

Updated on

मुंबई : सायबर भामट्यांनी आभासी अटकेच्या जाळ्यात ओढलेले भांडुप येथील कुटुंब रस्त्यावर येता येता वाचले. दहशतवादी कृतीत थेट सहभाग निष्पन्न झाल्याची भीती घालून भामट्यांनी या कुटुंबाकडून ४० लाख उकळले. पैशांची पुढील मागणी पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने घर विकण्याचा निर्णय घेतला; मात्र हा निर्णय प्रत्यक्षात उतरण्याआधीच फसवणूक सुरू असल्याची कुणकुण लागल्याने कुटुंब सावध झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com