

Fraud Case
ESakal
मुंबई : सायबर भामट्यांनी कॉल फॉरवर्डिंग तंत्रज्ञानाचा वापर करत फसवणुकीचे जाळे मुंबईसारख्या शहरांवर टाकले आहे. विशेष म्हणजे अशिक्षितांसह सुशिक्षितही या जाळ्यात अडकत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या मागणीनुसार २१, ६१, ६७, ९९ या क्रमांकाने सुरू होणारे (मागे पुढे स्टार, हॅश टंग) १० अंकी 'कोड' अर्थात मोबाईल नंबर डायल न करण्याचे आवाहन केले आहे.