ठाणे : काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा उत्साह बाजारात दिसू लागला आहे. रविवारचा मुहूर्त साधत ठाणेकरांनी खरेदीचा उत्सव साजरा केला. तर दुसरीकडे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन खरेदीचाही धडका सुरू आहे. प्रत्येक कंपनी ‘बंपर ऑफर्स’, ‘मेगा सेल’, ‘९९ टक्क्यांपर्यंत सूट’ अशा जाहिराती देत असून ग्राहकांचा त्याला प्रतिसादही मिळत आहे; मात्र सोबतच फसवणुकीचे जाळे वेगाने वाढत आहे.