

‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम अजून काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
esakal
Bay Of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसत आहे. बुधवारी दुपारनंतर वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीला फटका बसला आहे. किनारपट्टीवर सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मासेमारी नौका बंदरात उभ्या राहिल्यामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वादळसदृश स्थिती उद्भवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याप्रमाणे बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सातत्याने बदल घडत आहेत.