अरबी समुद्रात आलंय हिक्का नावाचं चक्रीवादळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मुंबई  : अरबी समुद्रात हिक्का नावाचं चक्रीवादळ निर्माण झाले आहे. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतरण आता चक्रीवादळात झाले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने चक्रीवादळास हिक्का हे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले असून, मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही.

किंचित परिणाम म्हणून गुजरातमध्ये मध्यम तर कोकण आणि गोवा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.२६ सप्टेंबर रोजी मुंबईसह कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरातमध्ये पावसाळी गतिविधी सुरु होत्या. गेल्या २४ तासांत गुजरातमधील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला.

पूर्वेकडील वडोदरा येथे 12.4 मिमी पावसाची नोंद झाली. तर पोरबंदर आणि वेरावळमध्ये अनुक्रमे ११ मिमी आणि ५.४ मिमी पाऊस पडला. येत्या २४ ते ४८ तासांत गुजरातच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात एक- दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एक मान्सून प्रणाली तयार होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण द्वीपकल्पाकडे सरकेल. ज्यामुळे आठवड्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पाऊस होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone Storm Hikka To Reach Coast