सिलिंडरच्या स्फोटात हातगाडी खाक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड महामार्गावरील टेमघर नाका-पाईपलाईन येथील जय अंबे शेवपुरी सेंटरच्या हातगाडीवर सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत गाडीमालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भररस्त्यावर हा प्रकार झाल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली होती. 

सूरज गुप्ता (26) असे सिलिंडर गॅसच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या गाडीमालकाचे नाव आहे. त्याचे कल्याण रोड परिसरातील टेमघर नाका येथे जय अंबे शेवपुरीचे सेंटर आहे. रोजच्याप्रमाणे त्याने सिलिंडर गॅस चालू केला असता त्याचा अचानक स्फोट होऊन त्यास आग लागली.

या आगीत गंभीर जखमी झालेल्या सूरज यास उपचारासाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत हातगाडीलगतची एक ऍक्‍टिव्हा दुचाकी आणि भेलपुरीची हातगाडी खाक झाली आहे. या आगीच्या घटनेची नोंद शांतीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Web Title: Cylinder blast