"नाश्‍ता हाऊस'मध्ये सिलिंडरचा स्फोट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

उल्हासनगर : नाश्‍ता हाऊसमध्ये सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात कारागीराचा जागीच मृत्यू झाल्याची उल्हासनगरात आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या घटनेतत एक ग्राहकही होरपळला असून, त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंद यादव (28) असे मृत कारागीराचे नाव आहे. 

उल्हासनगर कॅम्प 3 मधील सीब्लॉक गुरुद्वारासमोर "सद्‌गुरु नाश्‍ता हाऊस आहे. चविष्ट नाश्‍ता मिळत असल्याने विशेषतः सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास नाश्‍ता हाऊसमध्ये साफसफाईचे काम सुरू होते. त्याच वेळी एका ग्राहकाला भजी हवी असल्याने कारागीर गोविंद याने गॅस पेटवला. मात्र सिलिंडरमधून गळती होत असल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात गोविंदचा होरपळून जागीच मृत्यू झाला; तर ग्राहक धीरज वर्मा हा आगीत होरपळला.

घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. 

web title : नाश्‍ता हाऊसमध्ये सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात कारागीराचा जागीच मृत्यू झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder Explosion at "Breakfast House"