कांदे-बटाटे विकायचा, डिलिव्हरी बॉयचं काम करायचा; लग्न ठरवायला गावी जायचं तिकीट खिशातच राहिलं, बेस्टच्या धडकेत मृत्यू

Dadar BEST Bus Accident उत्तर प्रदेशातील २८ वर्षीय नियाज मोहरम अहमद अलीचा दादरच्या बस अपघातात मृत्यू झाला. नियाज हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. त्याच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला.
Mumbai Crash Kills Family's Sole Breadwinner

Mumbai Crash Kills Family's Sole Breadwinner

Esakal

Updated on

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८: उत्तर प्रदेशहून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या २८ वर्षीय नियाज मोहरम अहमद अलीचा दादरच्या बस अपघातात मृत्यू झाला. नियाज हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. नियाजचे आई वडील उत्तर प्रदेशच्या बहिराईच या मूळ गावात राहतात. नियाज गेल्या चार वर्षापासून मुंबईत स्थायिक होता. तो वरळी येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि अधिक उत्पन्नासाठी तो स्विगी, इन्स्टामार्टमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. वडिलांची तब्येत बिघडलेली असल्याने तोच घर चालवत होता. त्याच्यावर लहान बहिणीच्या लग्नाची जबाबदारीही होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com