

Dadar BEST Bus Accident
Esakal
Dadar Bus Accident: मुंबईत दादर प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. दादरमध्ये प्लाझा परिसरात सकाळच्या वेळी झालेल्या या अपघाताने खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी गर्दीच्या वेळीच झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले असल्याचं म्हटलं जात आहे.