

Dadar BEST Bus Accident Video
ESakal
मुंबई : दादर (पश्चिम) येथील गजबजलेल्या प्लाझा सिनेमासमोरील वीर कोतवाल उद्यान परिसरात आज (ता.८) सकाळी पावणे अकराच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. एका बेभान बेस्ट बसने एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या चार पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.