esakal | दादर : ५१ वर्षांच्या इंजिनिअरची आत्महत्या; ३६ व्या मजल्यावरुन उडी| suicide
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

दादर : ५१ वर्षांच्या इंजिनिअरची आत्महत्या; ३६ व्या मजल्यावरुन उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दादर (Dadar) येथे ५१ वर्षांच्या एका इंजिनिअरने आत्महत्या (engineer suicide) केल्याची घटना दुपारी दादर परिसरात घडली. निखील माधव जोशी (nikhil joshi) असे या इंजिनिअरचे नाव असून त्यांनी ३६ वर्षांच्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र कामाच्या अतिरिक्त ताणामुळे नैराश्यातून (work depression) त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

हेही वाचा: आरोप करणाऱ्या महिलेला ओळखत नाही; आमदार साटम यांचा खुलासा

दुसरीकडे ही आत्महत्या आहे की ते इमारतीवरुन खाली पडले याचाही पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजता दादर येथील सेनापती बापट मार्ग, सनशाईन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या ३६ व्या मजल्यावर सुनंदा स्पेशलिटी कोटींग प्रायव्हेंट लिमिटेड कंपनीचे एक कार्यालय आहे. तिथेच निखिल जोशी हे इंजिनिअर म्हणून काम करीत होते.

हेही वाचा: घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिरिक्त ताण होता. त्यातून त्यांना मानसिक नैराश्य आले होते. शुक्रवारी सकाळी निखील हे नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर ते इमारतीच्या टेरेसवर गेले. दुपारी दिड वाजता त्यांनी इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूजंय हिरेमठ यांच्यासह दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. निखील यांना तातडीने पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे त्यांना डॉक्टरांनी अधिकृत मृत घोषित केले.

त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात निखील जोशी हे दादर येथील जे. के सावंत मार्गावरील इंद्रायणी सोसायटीच्या डी विंगच्या फ्लॅट क्रमांक ३१ मध्ये राहत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कामाचा प्रचंड ताण होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

loading image
go to top