Dadar Kabutar Khana: ऐतिहासिक कबुतरखान्यावरुन राडा, जैन समाजाचा आक्रमक पवित्रा, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

Dadar Kabutar Khana: त्यामुळे हा कबुतरखाना तोडून टाकू नये, अशी मागणी जोर धरत आहे. आज प्रार्थना सभा होणार होती जैन धर्मगुरुंसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार होते. सभेआधी आंदोलक आक्रमक झाले, काही वेळाने आंदोलन मागे घेण्यात आले.
Dadar Kabutar Khana
Dadar Kabutar Khana
Updated on: 

Dadar Kabutar Khana News: दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्यावरील बंदीवरुन जैन समाज आक्रमक झाला असून समाजाने आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली यावेळी पोलिसांशी झटापटही झाली. मात्र काही वेळाने पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com