
दादरमधील कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. हायकोर्टानेही मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खायला घालू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही काही जैन व्यक्तींकडून कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. पोलिसांनी काही लोकांवरही कारवाई केली आहे, तरी काही लोक कबुतरांना दाणे टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचा टी-शर्ट सध्या चर्चेत आहे.