esakal | दादर-माहीम नाला गाळ-कचऱ्याने तुडुंबc
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दादर-माहीम नाला गाळ-कचऱ्याने तुडुंब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारावी : धारावीतील (Dharavi) ६० फुटी रस्त्यावरील दादर-माहीम नाला धारावीतील सर्वांत मोठा नाला आहे. या नाल्यातून लेबर कॅम्प, शाहूनगर, बालिगानगर, कुंभारवाडा आदी विभागांतील सांडपाणी वाहून नेले जाते. सध्या हा नाला गाळ व कचऱ्याने तुडुंब भरला आहे. यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही.

नाला गाळाने व कचऱ्याने गच्च भरला आहे. यामुळे नाल्याच्या लगत असलेल्या वस्त्यांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. कीटक, डास आदींचा त्रास वाढला आहे. यामुळे वस्तीतील लहान मुले व रहिवासी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्याच्या साफसफाई करण्याकडे ग/उत्तर विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. नाल्यात जमा झालेल्या गाळ व कचऱ्यामुळे विभागात रोगराई वाढत चालली आहे. येथील प्रत्येक घरात एक व्यक्ती आजारी असल्याचे रहिवासी सांगतात. यामुळे स्थानिकांना होत असलेल्या त्रासाकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन लवकरात लवकर नाल्याची सफाई करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: पुराच्या पाण्यात उतरून शेतकर्‍यांची शासनाकडे मदतीची मागणी;पाहा व्हिडिओ

नाल्यात गाळ व कचरा वाढू शकतात. सध्या डेंग्यूची साथ वाढत आहे. नाल्यातून मच्छराची पैदास होण्याची भीती आहे. रहिवाशांना याचा त्रास होऊ शकतो यासाठी पालिकेने वेळीच नाले सफाई करून घेणे गरजेचे आहे.

- डॉ. कैलास गौड, स्थानिक

loading image
go to top