डहाणूत समुद्रकिनारी दिसले बंदुकधारी व्यक्ती

अच्युत पाटिल
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

बोर्डी : डहाणु तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या चिखले गावात काही संशयित बंदुकधारी व्यक्ती आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सुरु केलेली शोध मोहिम मंगळवारी सकाळपासून चालू ठेवण्यात आली.

बोर्डी : डहाणु तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या चिखले गावात काही संशयित बंदुकधारी व्यक्ती आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सुरु केलेली शोध मोहिम मंगळवारी सकाळपासून चालू ठेवण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी योगेश राऊत यांनी आज सकाळी घोलवड पोलिस ठाण्यात हजर राहून सोमवारी रात्री घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. चिखले येथील अच्युतराव पटवर्धन वन क्षेत्राच्या भागात समुद्र किनाऱ्यावर काही व्यक्तींची हालचाल दिसली. त्यापैकी एका व्यक्तीच्या अंगावरील चादर पडताच त्याच्या खांद्यावर स्टेनगनसारखी दिसणारी बंदूक होती. त्या माणसाचा चेहरा पाहिला आहे, असे स्पष्ट केल्याने पोलिसांनी शोध मोहिमेला गती दिली आहे.

रँपिड अँक्शन फोर्स, पालघर पोलिस ,सागर, ग्राम रक्षकदलाच्या मदतीने चिखले, वडकतीपाडा, खाडीपाडा, भाईपाडा, आंबावाडी आणि परिसर पिंजून काढला जातो. बंद घरं, वाड्या, घनदाट जंगल असलेला भाग, हाँटेल, रिसॉर्टमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. डहाणु उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड, डहाणू पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी यादव शोध मोहिमेच्या पथकात सहभागी झाले आहेत. गोळीबार झाल्याची कथित घटना लक्षात घेऊन घोलवड पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील परवानाधारक शस्त्राची सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात तपासणी करण्यात आली.

दरम्यान, गुजरात राज्यातील उंबरगाव तालुचक्याच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावातही सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. संशयास्पद परिस्थितीमुळे भयभीत झालेल्या काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही.

Web Title: In Dahanu near sea one Man Found with Gun