गोविंदांना मिळणार १० लाखांचा विमा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

भायखळा - दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना यंदा १० लाखांचा विमा मिळणार असल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली. सुरक्षिततेसंदर्भात गेल्या वर्षी लागलेल्या न्यायालयाचा निकाल नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत न्यायालयाच्या आदेशानुसार १० लाखांचा विमा काढणे हितकारक आणि तितकाच बंधनकारक आहे. सरावापासून विमा गोविंदांना लागू होणार आहे. सेफ्टी बेल्ट, चेस कार्ड, प्रोटेक्‍टर इत्यादी असणे बंधनकारक आहे, अशी विनंती समन्वय समितीने केली आहे. केवळ १४ वर्षांवरील गोविंदांनी पथकात सहभागी व्हावे. त्याखालील लहान गोविंदांनी पथकात सहभागी होऊ नये, असे आवाहनही सामान्य समिती सेक्रेटरी अरुण पाटील यांनी केले आहे.

Web Title: Dahihandi festival Govinda gets insurance of 10 lakhs

टॅग्स