छोट्या गोविंदांची घागर उताणीच

उत्कर्षा पाटील
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - दहीहंडी उत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गोविंदा पथकांची प्रायोजकत्वासाठी धावाधाव सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते त्या-त्या भागातील गोविंदा पथकांना प्रायोजकत्व देण्यास पुढाकार घेतील, अशी त्यांना आशा आहे; पण प्रत्यक्षात अनेक छोट्या गोविंदा पथकांना प्रायोजकत्वासाठी पायपीट करावी लागतेय. मोठ्या आणि प्रसिद्ध गोविंदा पथकांना राजकीय पक्षांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. त्यामुळे या धामधुमीत छोट्या गोविंदा पथकांची घागर उताणीच आहे.

छोट्या गोविंदा मंडळांना राजकीय पुढाऱ्यांकडून अपेक्षेप्रमाणे मदत मिळत नाही. जय जवान आणि ताडवाडीसारख्या प्रसिद्ध गोविंदा पथकांना राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले आहे. छोट्या गोविंदा मंडळांना राजकीय पुढाऱ्यांकडून अपेक्षेप्रमाणे मदत मिळत नसल्याने खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न पडला आहे. 

गोविंदा पथकाचा उत्सवाच्या दिवशीचा खर्च दोन ते अडीच लाख असल्यामुळे प्रायोजक मिळवावेच लागतात. यंदा आमच्या पथकाचा संपूर्ण खर्च महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव करणार आहेत. गोविंदांना राजकीय नेत्यांनी प्रायोजकत्व देण्यासाठी पुढाकार घ्यावा तरच गोविंदा पथके दहीहंडी उत्सव साजरा करू शकतील, असे ताडवाडी गोविंदा पथकाचे अरुण पाटील यांनी सांगितले. 

जय जवान गोविंदा पथकाला गेली चार वर्षे भाजपच्या उज्ज्वला मोडक प्रायोजकत्व देत आहेत, अशी माहिती पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी  दिली.

विविध कंपन्यांमधून प्रायोजकत्व मिळवावे लागते. मात्र राजकीय पक्षाचे नेते देणगी आणि टी-शर्टसाठी प्रायोजकत्व देण्यास पुढाकार घेत नाहीत.
- कमलेश भोईर, यंग उमरखाडी गोविंदा पथक 

वरळी भागात मनसे, भाजप अन्‌ शिवसेनेतर्फे टी-शर्टसाठी प्रायोजकत्व मिळते; पण जाहिरात, वाहतूक खर्च आदींच्या प्रायोजकत्वासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
- प्रतीक काळे, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ व गोविंदा पथक

राजकीय पक्षांकडून प्रायोजकत्व मिळवण्यास आम्हा गोविंदा पथकांना खूप पायपीट केल्यानंतर मदत मिळते. पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही. 
- विकास राणे,  माऊली गोविंदा पथक, भांडुप

Web Title: Dahihandi festival small govinda