विमा न उतरवल्यास गोविंदांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

प्रत्येक गोविंदा पथकाने सदस्यांचा विमा उतरवणे बंधनकारक असल्याचा आदेश मागील वर्षीच मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे पालन न केल्यास गोविंदांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे गोविंदांनी विमा कवच घेऊनच सुरक्षित दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केले आहे.

मुंबई - प्रत्येक गोविंदा पथकाने सदस्यांचा विमा उतरवणे बंधनकारक असल्याचा आदेश मागील वर्षीच मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे पालन न केल्यास गोविंदांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे गोविंदांनी विमा कवच घेऊनच सुरक्षित दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केले आहे. मोठ्या गोविंदा पथकांमध्ये ३०० हून अधिक; तर छोट्या गोविंदा पथकांमध्ये १०० ते १५० जणांचा समावेश असतो. काही छोटी मंडळे गोविंदांचा विमा उतरवत नसल्याचे मागील वर्षी आढळले होते. विमाकवच न घेणाऱ्या गोविंदांवर या वर्षी कारवाई होईल, अशी माहिती दहीहंडी उत्सव समितीने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi Govinda Without Insurance Crime