

Dahisar-Bhayandar Coastal Road
ESakal
मुंबई : दहिसर ते भाईंदर यादरम्यानच्या मुंबई किनारी रस्ता उत्तर (कोस्टल रोड नॉर्थ) प्रकल्पाच्या विस्तारासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. मात्र, हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीबाहेर जात असतानाही त्याचा संपूर्ण आर्थिक भार मुंबईकरांच्या खिशातून का सोसायचा, असा संतप्त सवाल करत सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.