

मुंबईत दहिसर पश्चिम भागात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारावेळी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. घरात प्रचार करायला विरोध केल्यानं ही मारहाण करण्यात आलीय. सोमवारी सायंकाळी दहिसर प्रभाग क्रमांक एकमद्ये ही घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते हे रेखा राम यादव यांचा प्रचार करत होते. दहिसर पश्चिम इथल्या विठ्ठलवाडी सोसायटीत रेखा यादव यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती.