esakal | दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये पुन्हा सापडला 10 फुटी अजगर!
sakal

बोलून बातमी शोधा

python snake

दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये पुन्हा सापडला 10 फुटी अजगर!

sakal_logo
By
सचिन सावंत

दहिसर : कोरोना लसीकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये (Dahisar corona center) काल रात्री पुन्हा एकदा अजगर (Ten foot python) सापडल्याने एकच खळबळ माजली. गेल्या पंधरवड्यात ही दुसरी घटना (Second time found) आहे. यापूर्वी देखील 16 ऑगस्ट रोजी याठिकाणी अजगर सापडला होता. दरम्यान काल रात्री सुरक्षा रक्षकांना (Security guards) याबाबतची माहिती मिळताच त्यांनी नजीकच्या केतकी पाड्यात राहणारे सर्पमित्र (snake handler) सुरज रवींद्र यादव (ravindra yadav) यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यादव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 10 फुटी अजगराला सुखरूप पकडले.

हेही वाचा: केंद्रीय विमा योजनेच्या नावाखाली ऑनलाईनद्वारे कोट्यावधींचा गंडा

यावेळी भल्या मोठ्या दगडाखाली लपलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढतांना यादवच्या हाताला दुखापत झाली. त्याला मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी अजगराची जंगलात सुखरुप सुटका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात करण्यात आली. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी दहिसर चेक नाका येथे जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती केली आहे. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर या ठिकाणी असलेल्या रुग्णांचे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू मुंबईतील रुग्ण संख्या कमी होत असल्याने या ठिकाणी सध्या एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही. मात्र या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू असल्याने पहाटेपासूनच लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात .

loading image
go to top