esakal | केंद्रीय विमा योजनेच्या नावाखाली ऑनलाईनद्वारे कोट्यावधींचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

केंद्रीय विमा योजनेच्या नावाखाली ऑनलाईनद्वारे कोट्यावधींचा गंडा

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) असलेल्या निवृत्ती योजनेचे (Retirement scheme) पैसे मिळवून देण्याचे आमीष दाखवून सायबर भामट्यांनी (online crore rupees Fraud) कोट्यावधींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस (cyber police) अधिक तपास करत आहेत. तक्रारदार सिंहासन प्रसाद (60) हे अणुशक्ती नगर येथील रहिवासी असून तेथील केंद्रीय विभागात कामाला होते. नुकतेच ते सेवेतून निवृत्त झाले. केंद्रीय कर्मचा-यांसाठी असलेल्या सीजीईआयएस या योजनेत त्यांची रक्कम गुंतवली होती.

हेही वाचा: दिव्यात काँक्रीटीकरण रस्त्यावर बेकायदा पार्किंग; वाहनचालकांना नाहक त्रास

त्यात त्यांचे चार लाख 30 हजार रुपये भरायचे बाकी होती. नेमकी याचीच माहिती कशीतरी करून सायबर भामट्यांना मिळाली. त्याचा फायदा उचून आरोपींनी आपण सीजीईआयएसमधून बोलत असल्याचे भासवून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केले. त्यांची विमा योजनेतील रक्कम मिळवून देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून विमा खाते व बँक खात्याबद्दलची गुप्त माहिती आरोपींनी मिळवली. तक्रारदार सिंहासन प्रसाद यांना सीजीईआयएस व संबंधीत केंद्रीय यंत्रणांमधून बोलत असल्याचे आरोपींनी भासवले.

गेल्या चार पाच महिन्यांच्या कालावधीत तक्रारदार यांना अंजली वर्मा, माथूर, पश्चिम श्रीवास्तव, आर. के. नारायण, एस. एन. महापात्रा, गीता शहा, रविंद्र दास, राकेश मेहता व रुघुनाथ शाह अशा व्यक्तींनी त्यांना संपर्क साधून तक्रारदार यांची एक कोटी 14 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. प्रसाद यांनी दोन आठवड्यांपूर्वी या योजनाबाबत चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.अखेर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पूर्वी प्रादेशिक सायबर विभागाने याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनी खोटी नाव व तोतया अधिकारी बनून फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top