दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास

सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली माहिती
दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास
  • दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानात घुसून केली होती हत्या

  • गोळी झाडणारा तरून अवघ्या १८ वर्षांचा

मुंबई: बोरिवलीपासून जवळच असलेल्या दहिसर (Dahisar) भागात बुधवारी धक्कादायक घटना घडली. दहिसरमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार (Mumbai firing) करण्यात आला. दहिसर पूर्वेला रावल पाडा परिसरात गावडेनगरमध्ये ओम साई राज ज्वेलर्सचे (om Sai raj jewelers) दुकानात सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून दुकानदाराला गोळ्या घालून ठार केले आणि सोन्याचा माल लुटला. या खुन्यांना अवघ्या दोन दिवसांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले. एका बुटावरून पोलिसांनी खुनी आरोपींचा शोध लावल्याची माहिती मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. (Dahisar Jewelry Shop Firing Murderers arrested by Mumbai Police because of one of shoes)

दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास
धक्कादायक! दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या

"दहिसर पोलिसांनी दरोडा व खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. गोळी झाडून दुकानदाराची हत्या करणारे तिघे जण दागिने लुटून पळून गेले होते. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून तिघांनी अटक केली. ज्यांनी या सर्व गुन्ह्यांचा कट रचला त्या दोन सूत्धाररांना अटक करण्यात यश आले. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते गुजरातच्या एका खेडेगावात लपले होते. प्राथमिक तपासात एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. ती गाडी चोरीची होती. काही अंतरावर हे आरोपी एका कारने आले होते. आरोपीच्या एका बुटावरून गुन्हा उघडकीस आला. दुचाकी चोरताना जे बूट पायात दिसले तेच बूट दहिसरच्या गुन्ह्यातही आरोपीच्या पायात होते", अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास
संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."

"संशयित आरोपी कोणतीही माहिती देत नव्हते. एकाच्या सोशल मीडियावरून आरोपींची ओळख पटली. गुन्ह्यात ३० तोळे सोनं जप्त केलं. सहा महिन्यांपूर्वी हत्यारासाठी पैसे दिले होते. त्या आरोपीचा शोध सुरू आहे. इंदोरहून हे आरोपी आले होते. ओळख लपवण्यासाठी ते कारमध्येच झोपले. ज्वेलर्स मालकाच्या टेबलखाली आलार्मचे बटण होते. ते बटण दाबता येऊ नये म्हणून काहीही न विचार करता गोळी मारली असं आरोपींना सांगितले. गोळी मारणारा १८ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली आहे", असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास
राज्याचा कारभार गतिमान करा; शरद पवारांचा ठाकरेंना सल्ला

एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. ज्यांनी त्यांना घरात आसरा दिला त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, सर्व आरोपी १८ ते २५ या वयोगटातील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com