Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Mumbai Local Train Passenger Crowd: पश्चिम रेल्वेवर दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून वाढत्या गर्दीच्या नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार घेतला जाणार आहे.
Western Railway Passenger Crowd

Western Railway Passenger Crowd

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशांचा भार असताना वाढत्या गर्दीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याऐवजी आता कंत्राटी मनुष्यबळाचा आधार घेतला जाणार आहे. एकीकडे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस दलातील तब्बल २,५५९ पदे रिक्त असून नियमित मनुष्यबळाची कमतरता कायम आहे; मात्र, ही पदे भरण्याऐवजी गर्दी नियंत्रणाची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपविण्याचा मार्ग स्वीकारला जात आहे. गर्दीच्या वेळेत फलाट, जिने, पादचारी पूल आणि लोकलच्या दरवाजांजवळील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्थानकांवर कंत्राटी कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com