'तुम्ही तर मोठ्या तत्परतेने काम करता, तुम्हाला कशाला हवा वेळ'? कंगना प्रकरणी न्यायालयाचा BMCला टोला

सुनिता महामुणकर
Thursday, 24 September 2020

अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील घरावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाडकामाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील घरावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाडकामाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ही सुनावणी काल होणार होती. परंतु मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

22 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास परवानगी नाही; वैद्यकिय अहवालाची हायकोर्टाकडून दखल

मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्री कंगना रनौतने बीएमसी विरोधात दावा ठोकला आहे. न्यायालयाने कंगनाच्या घराच्या बांधकाम पाडल्याप्रकरणावर उद्यापासून दररोज सुनावणी घेणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त वेळ बांधकाम जैसे थे ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी बीएमसीला विचारणा केल्यावर, बीएमसीने न्यायालायाला उत्तरासाठी वेळ मागितला होता. परंतु तुम्ही तर मोठ्या तत्परतेने कारवाई करण्यासाठी ओळखले जातात तुम्हाला वेळ कशासाठी हवा? असा टोला बीएमसीला न्यायालयाने लगावला.

'पवारांना आलेली नोटीस सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातल्या ११३ कोटी रुपयांच्या वांग्या एवढी खरी'

या याचिकेत उखाड दिया असे म्हटल्याने खासदार संजय राऊत यांना देखील पक्ष कऱण्यात आले होते. त्यांनी न्यायालयाला आपली बाजू मांडण्यासाठी 8 दिवसांचा अवधी मागितला आहे. न्यायालायाने त्यांना 8 दिवसांचा अवधी दिला आहे. संजय राऊत यांना 28 सप्टेंबरला आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडावे लागणार आहे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily hearing on Kangana Ranauts house demolition case from tomorrow

टॉपिकस