दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

Raja Dhale
Raja Dhale

मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज (मंगळवार) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. 

विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती  त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे. 

राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच शोक व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com