esakal | काळ्या बुरशीमुळे फुप्फुसांचे नुकसान ।Corona
sakal

बोलून बातमी शोधा

Black Fungus

मुंबई: काळ्या बुरशीमुळे फुप्फुसांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनावर मात केलेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’ (काळी बुरशी)चा फटका बसला आहे. काळ्या बुरशीमुळे केवळ डोळे, नाक आणि तोंडावरच परिणाम होत नाही तर फुप्फुसांवरही परिणाम होत आहे. राज्य वैद्यकीय विभागाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे उघड झाले आहे. हा अभ्यास म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर करण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण अधिक होते. राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत म्युकरमायकोसिससंदर्भात २० हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी केली होती. त्यापैकी तीन हजारांहून अधिक रुग्णांना म्युकरमायकोसिसमुळे राज्यभरातील विविध सरकारी रुग्णालयांत दाखल केले होते.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, म्युकरमायकोसिसमुळे झालेल्या २४२ मृत्यूंवर अभ्यास केला. काळ्या बुरशीमुळे शरीराचे कोणते भाग अधिक प्रभावित होतात हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की, काळ्या बुरशीमुळे ९८ टक्के रुग्णांच्या सायनसवर परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त ६५ टक्के रुग्णांच्या डोळ्यांवर परिणाम झाला, तर ३२ टक्के रुग्णांच्या तोंडावर आणि १२ टक्के रुग्णांच्या फुप्फुसांवर परिणाम झाला. उच्च मधुमेहाचे रुग्ण काळ्या बुरशीचे अधिक बळी पडल्याचेही अभ्यासात उघड झाले आहे.

याव्यतिरिक्त ज्या रुग्णांमध्ये कोरोना दरम्यान ऑक्सिजनची पातळी सर्वांत कमी होती, ते कोरोनामधून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिसने प्रभावित झाले. म्युकरमायकोसिसमुळे झालेल्या मृत्यूंपैकी १६ टक्के मृत्यू केवळ सरकारी रुग्णालयात झाले.

"सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णांमध्ये या आजाराविषयी जनजागृती झाली आहे. काळ्या बुरशीला शरीराच्या इतर भागात पसरण्यापासून रोखण्यासाठी हा अभ्यास प्रभावी ठरेल"- डॉ. हेतल मारफातिया, सदस्य, टास्क फोर्स

loading image
go to top