Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवली येथे महिलांसाठी दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त

60 टक्के पोलीस अधिकारी कर्मचारी आज रस्त्यावर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची माहिती
Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवली येथे महिलांसाठी दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त

कल्याण : नववर्षाचे स्वागत आणि त्यात रविवारच्या सुट्टीचा दिवस आल्याने कल्याण डोंबिवलीतील महत्त्वाच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रात्रीच्या वेळेतही मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडू शकतात. त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवलीतील पोलीस सज्ज झाले आहेत. कल्याण आणि डोंबिवली या ठाणे पोलिसांच्या परिमंडळ 3 मध्ये तब्बल 60 टक्के पोलीस अधिकारी कर्मचारी आज रस्त्यावर उतरणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

तसेच विशेषतः महिला आणि मुलींची छेडछाड, विनयभंग, चैन- मोबाईल खेचून नेणे आदी प्रकार रोखण्यासाठी खास दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तर वाहतुक पोलिसांकडून शहरातील सर्व प्रवेशद्वारावर विशेष नाकाबंदी केली जाणार असून ब्रेथ अॅनलायझरच्या माध्यमातुन मद्यपी वाहन चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे.या सोबतच शहरात ऑल आऊट मोहिमेद्वारे हद्दपार, पाहिजे असलेल्या आरोपींविरोधात सुरू असलेली कारवाईही कायम ठेवली जाणार आहे.

जुने वर्ष संपायला आणि नविन वर्ष सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या नव्या वर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी अनेकांनी तयारी केली आहे. मात्र या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या नावाखाली इतरांना त्रास होईल अशा प्रकारे धांगडधिंगा कराल तर मग तुमची काही खैर नाही.

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशन दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली असून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.तसेच न्यू इयरसे लिब्रेशनदरम्यान अति उत्साहात होणारी संभावित गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com