भोगावती नदीकिनाऱ्यालगतच्या गावांना धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पेणमध्ये मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण पूर्णपणे भरले आहे. धरणातील पाण्याचा शनिवारी विसर्ग करण्यात आल्याने भोगावती नदीच्या पात्रात वाढ झाली. त्यामुळे भोगावती नदीकिनाऱ्यालगतच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा धोका कमी झाला आहे.

मुंबई : पेणमध्ये मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण पूर्णपणे भरले आहे. धरणातील पाण्याचा शनिवारी विसर्ग करण्यात आल्याने भोगावती नदीच्या पात्रात वाढ झाली. त्यामुळे भोगावती नदीकिनाऱ्यालगतच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा धोका कमी झाला आहे. शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

पेण तालुक्‍यातील भोगावती, बाळगंगा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली असून पेणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेण तालुक्‍यात पावसाची रिपरिप सुरू आहे. भोगावती, बाळगंगा, पाताळगंगा, अंबा, निगडे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हेटवणे धरण क्षेत्रातदेखील जोरदार पाऊस झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने भोगावती नदीच्या पात्रात वाढ झाली होती. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने भोगावती नदीकिनारच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. 

 

गणेशमूर्ती कारखानदारांचे नुकसान 
अंतोरे, नवघर गावात पाणी शिरले होते. आता तेथील परिस्थिती पूर्ववत झाली आहे. नवघर-अंतोरे रस्ता पाण्याखाली गेला आहे. नवघर येथून अंतोरे येथे येण्यासाठी होडीचा वापर केला जात आहे. तांबडशेत-जोहे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कळवे, तांबडशेत, जोहे परिसरात गणेशमूर्ती कारखानदारांचेही पुरामुळे नुकसान झाले आहे. आमदार धैर्यशील पाटील यांनी तांबडशेत, जोहे येथे भेट देऊन पाहणी केली. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

भातशेती पाण्याखाली 
बाळगंगा नदीला पूर आला असून या नदीकिनारच्या खरोशी, दुरशेत, बळवली गावांना धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील सर्व भातशेतीचेदेखील नुकसान झाले आहे. अंबा नदीशेजारी असलेल्या पांडापूर, पाटणी, जुई, कासू, गडब, परिसरातील भातशेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangers to the villages along the Bhagawati River