मिक्सर, ग्राईंडरच्या जमान्यात पाटा वरवंट्याचे दुकान

अच्युत पाटील
बुधवार, 2 मे 2018

बोर्डी (पालघर) : गावोगाव धान्य दळण्याच्या गिरण्या, मिक्सर, ग्राईंडरच्या जमान्यात पारंपरिक जातं, पाटा-वरवंटा, खलबत्ता इत्यादी उपकरणाचा विसर पडला आहे.

मात्र आता पुन्हा या पारंपरिक वस्तूंना चांगले दिवस येतील अशी आशा उराशी बाळगून औरंगाबाद (कन्नड) पिशोर येथून गणेश काळू सुरे आपली पत्नी मंगला सोबत संतोष व शिवा दोन मुलांना चारशे किमी अंतरावरून पिकअप टेम्पोला अठराशे रुपये भाडे चुकवून सोबत जाते, खलबात्ता, वरवंटा-पाट्याचे दगड घेऊन बोर्डी गावात आला आहे.

सध्या गणेशचा मुक्काम धर्मशिळेच्या आवारात असून ग्राहकांच्या गरजेनुसार वस्तू तयार करीत आहे. जाते -1000, पाटा-वरवंटा - 500, खलबत्ता - 300 ते 400 रुपये किंमतीने विक्री करीत आहे.

Web Title: days of mixer grinder shop of pata varavanta

टॅग्स