
Deputy CM Eknath Shinde
ठाणे : ठाणे ते भिवंडी-वडपे रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तो काय मुंबई-गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का?’ असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.