
ठाणे : मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठीला हा दर्जा दिल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी रंगायतन येथे आज ‘मराठी भाषा अभिजात गौरव सोहळा’प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की, मराठी ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती आहे. तसेच, वाचनाने समृद्ध झालेले मस्तक कोणाचेही हस्तक होत नाही, यावर त्यांनी जोर दिला.