
ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. येथील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता. ८) त्यांनी गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.