Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट
Mumbai Rain Update: मुंबईत मागील २४ तासांत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास भेट दिली.
Eknath Shinde visits Mumbai emergency control room Esakal
मुंबई : मुंबईत मागील २४ तासांत ३५० मिमी पावसाची नोंद झाली असून, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास भेट दिली.