मृत तरुणीचे नेत्रदान करून समाजासमोर आदर्श

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

ठाणे - प्रेमप्रकरणातून २० वर्षीय प्राची झाडे या तरुणीची हत्या करणाऱ्या आकाश पवार या माथेफिरू तरुणाला ठाणे सत्र न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू केला असून गुन्ह्यात आकाश याला कोणीही मदत केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे घटनास्थळी आकाशसोबत त्याचा मित्र असल्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. दरम्यान, मृत तरुणीचे नेत्रदान करून दु:खातही तिच्या पालकांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

दरम्यान, पालकांच्या तक्रारीवरून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आकाश याने प्राची हिच्याशी तीन वर्षांपासून मैत्री असल्याची कबुली दिली आहे. प्राचीने आपली साथ सोडून दुसऱ्याशी मैत्री केल्याचा आकाशला राग आला होता. यातूनच त्‍याने हे कृत्य केले.

Web Title: Dead young woman eye donation