कोरोना चाचणीसाठी ठेवलेला मृतदेह रुग्णालयातून झाला बेपत्ता, वाचा नक्की झालंय काय ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाचा  गोंधळ कारभार समोर येताना दिसतोय. नवी मुंबईच्या एनएमएमसी रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आता सरकारकडून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला आहे. प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येताना दिसतोय. नवी मुंबईच्या एनएमएमसी रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

नवी मुंबईमधल्या एनएमएमसी रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी ठेवण्यात आलेला मृतदेह अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हा मृतदेह अचानक कुठे गायब झाला हा प्रश्न रुग्णालय प्रशासन आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसमोर निर्माण झाला आहे. 

हेही वाचा: सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बनडायॉक्साईड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सीया ?

उलवे इथे राहणाऱ्या उमर फारूख शेख या २९ वर्षांच्या तरुणाचा ९ मे ला मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयानं खबरदारी म्हणून त्याची कोरोन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन ते तीन दिवसात मृतदेहाची कोरोना चाचणी करून तुमच्याकडे मृतदेह सोपवला जाईल असं उमरच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत त्याचा मृतदेह रुग्णालयात ठेवून घेण्यात आला होता. 

१४ मे ला त्याचा कोरोनाचा तपासणी अहवाल आला. त्यात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे उमरचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासठी रुग्णालयात आले. मात्र त्यांना रुग्णालयात उमरचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. उमरचा मृतदेह कुठे गेला याचं उत्तर रुग्णालय प्रशासनाकडेही नव्हतं. 

Big News: क्या बात है ! प्लाझ्मा थेरपी यशस्वी; नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

या सर्व प्रकरणात उमरचा मृतदेह नक्की कुठे आहे याबद्दलची माहिती रुग्णालय प्रशासन लपवत आहेत असा आरोप उमरच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मात्र आता सर्व प्रकारामुळे एनएमएमसी रुग्णालयामध्ये मृतदेहसुद्धा सुरक्षित नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.   

deadbody of a patient missing in NMMC hospital navi mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deadbody of a patient missing in NMMC hospital navi mumbai read full story