कर्ण-मूकबधिर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - उच्च शिक्षणासाठी मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषातज्ज्ञ उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. कर्ण व मूकबधिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, रोजगार संधीची उपलब्धता व कौशल्य विकासावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

राज्यस्तरीय कर्णबधिर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेमध्येही प्रवेश घेता यावा, यासाठी राज्य शासनामार्फत अशा शाळांमध्येही पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. या शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासकीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भातील आराखडा सादर करावा. तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेचा समावेशासंदर्भात विचार करण्यात येईल. मूकबधिरांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे शासकीय नोकरीमध्ये समावेशासाठी उच्च शिक्षणाची अट रद्द करण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Deaf students should focus on the development of skills