धक्कादायक ! शहापूरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

शहापुरात १७ एप्रिलला आढळून आलेल्या पहिल्या ६७ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा रविवारी (ता.3) मृत्यू झाला.

शहापूर : शहापुरात १७ एप्रिलला आढळून आलेल्या पहिल्या ६७ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा रविवारी (ता.3) मृत्यू झाला. ते ठाणे येथील होराईझन या रुग्णालयात उपचार घेत होते.

नक्की वाचा  : लॉकडाऊन : गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान, तालुक्यात कोरोना विषाणूने बाधित आठ रुग्ण आढळून आल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून शहापुरात पुढील आदेश येईपर्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९९ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये २५ व्यक्ती कसारा येथील शेट्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात व दहागाव येथील आदिवासी आश्रम शाळेत क्वारंटाईन असून ७४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत.

नक्की वाचा कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

शहापुरातील तहसील कार्यालय परिसरात ६७ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्यांना ठाणे येथील होराईझन या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोनाची चाचणी केली असता, ते कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके यांनी दिली.

 

Death of the first coronary artery disease found in Shahapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of the first coronary artery disease found in Shahapur