मुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय ? 

मुंबईतील जन्मदरात झाली घट, मृत्युदर वाढला; यामागची करणं काय ? 

मुंबई : मुंबईतील जन्मदरात घट होत असून मृत्यूदरात वाढ होत आहे. त्याचबरोबर माता मृत्यूदरातही वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात ही माहीती नमुद करण्यात आली आहे.

मुंबईत 2017 मध्ये मृत्यूदर 1 हजार लोकसंख्येमागे 6.98 होता. तोच 2019 पर्यंत 7.11 झाला आहे. तर, 2018 मध्ये हा दर 6.95 होता. त्याचबरोबर माता मृत्यूच्या दरातही वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1000 जिवंत मतांमागे मृत्यूदर 1.53 एवढा होता. 2018 मध्ये 1.44 आणि 2019 मध्ये 1.73 पर्यंत पोहचला आहे.

मृत्यूदरात वाढ होत असताना जन्मदरात घट होत आहे. 2017 मध्ये 1 हजार नागरीकांमागे जन्मदर हा 12.14 टक्के होता. तर,2018 मध्ये 11.83 आणि 2019 मध्ये 11.61  पर्यंत खाली आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत शहर भागातील लोकसंख्या पहिल्यांदाच घटली असल्याचे आढळले. तर, उपनगरातील लोकसंख्या वाढीचा वेगही मंदावला होता. एका अंदाजानुसार 2011 मध्ये मुंबईची लोकसंख्या दिड कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता होती. तर 2019 पर्यंत मुंबईची अंदाजीत लोकसंख्या 1 कोटी 28 लाखापर्यंत आहेत.

नागरीक कुटूंब नियोजनाला प्राधान्य देत असून पालिकेमार्फत कुटूंब नियोजनसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानाला यश येत आहे. असं मत महापालिकेच्या निवृत्त वैद्यकिय अधिकार्याने वर्तवले. तर,2017 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मृत्यूच्या नोदणी पध्दतीत बदल केला आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी मृत्यू होतो. त्याच ठिकाणी नोंदणी केली जाते. मुंबईत सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशातील अनेक भागातून उपचारासाठी रुग्ण येतात. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर जास्त असेल. असेही त्यांनी सांगितले. फक्त मुंबईतील नागरीकांच्या मृत्यूची नोंदणी तपासल्यास नक्की चित्र स्पष्ट होईल असहे त्यांनी सांगितले.

अर्भक मृत्यूदरातही घट 

मुंबईतील अर्भक मृत्यूदरातही घट झाली आहे. 2017 मध्ये 1000 अर्भकांमागे 26.33 जणांचा मृत्यू होत होता. 2018 मध्ये 24.63 आणि 2019 मधे हे प्रमाण 23.04 वर आले आहे.

(वरील आकडेवारी टक्क्यांमध्ये आहे )

जन्म नोंदणी 

  • 2017--154642
  • 2018--151187
  • 2019--148898

मृत्यू नोंदणी 

  • 2017--88845
  • 2018--88852
  • 2019---91223

अर्भक मृत्यू 

  • 2017--- 4071
  • 2018--3723
  • 2019---3430
  •  

माता मृत्यू 

  • 2017--236
  • 2018--218
  • 2019--- 257 

birth rate in mumbai increased and death rate of mumbai increased report bu BMC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com