esakal | देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार

महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे 'जलयुक्त शिवार'. याच जलयुक्त शिवारची आता महाविकास आघाडी सरकारकडून खुली चौकशी केली जाणार आहे. तसा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात SIT मार्फत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. कॅगने देखील जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगाने आता SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हंटल की, जलयुक्त शिवारवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. सोबतच याबाबत सातशेपेक्षा अधिक तक्रारीही आलेल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कंत्राटदारांना फायदा झाल्याच्याही तक्रारींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली जात होती. 

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती. जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. जलयुक्त शिवार योजनेसाठी तब्बल ९ हजार कोटी रुपये खर्च झाला, मात्र त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली आणि भूजल पातळी वाढली नाही अशीही शंका उपस्थित करण्यात आली आहे. म्हणूनच आता SIT मार्फत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी केली जाणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळाने आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला जलयुक्त शिवारच्या चौकशीचा निर्णय निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. 

open investigation of jalayukt shivar by SIT maharashtra cabinet devendra fadanavis