सर्पदंश झालेल्या गृहस्थाचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

File Photo
File Photo

वाडा : सर्पदंश झालेल्या रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरिता वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डाहे येथील रमेश गवळी (४६) हे शेतात काम करीत असताना सर्पदंश झाल्याने त्यांना रविवारी (ता.१७) सायंकाळी तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु सापाच्या विषाचा प्रभाव जास्त असल्याने उपचारास गवळी यांचे शरीर साथ देत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता व्हेटीलेटरची सुविधा असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आवश्‍यकता होती. रमेश गवळी यांचा मुलगा अनंता गवळी याने १०८ क्रमांकावर दोन ते तीन वेळा फोन केला असता जवळपास १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

तसेच प्रयत्न करूनही अन्य रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने अखेर रात्री साडेआठ वाजता गवळी यांचा मृत्यू झाला. केवळ वेळेवर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळल्यानेच रमेश गवळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश गवळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, १०८ या क्रमांकावर संपर्क साधला असता जवळपासच्या सहा ते सात रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे व त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न होऊ शकल्याचे उत्तर देण्यात आले. 

ग्रामीण भागातील गरीब रुग्णांचा रुग्णवाहिकेअभावी अशाप्रकारे मृत्यू व्हावा हे खरोखरच दुर्दैवी असून शासनाने अथवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अत्याधुनिक व सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णवाहिका ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. 
- जगदीश कोकाटे,
सामाजिक कार्यकर्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com