रुग्णालयांकडून फरफड झालेल्या पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू 

रुग्णालयांकडून फरफड झालेल्या पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू 

मुंबई : कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही पालिकेच्या चार रुग्णालयांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी नकार दिलेला पोलिसाचा अखेर मृत्यू झाला. कोरोनाचा मुंबई पोलिस दलातील हा तिसरा बळी आहे. 

त्य झालेला पोलिस हवालदार हा कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत होता. तापामुळे सोमवारी (ता.20) त्यांनी स्थानिक डॉक्‍टरकडे उपचार घेतले. पण फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर ते कस्तुरबा रुग्णालयात गेले. तेथील डॉक्‍टरांनी पोलिसासाठी जागा नसल्यामुळे नायर रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्‍टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही. खाट शिल्लक नसल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर ते बाप - लेक परळ येथील केईएम रुग्णालयात गेले. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. 

ठिकठिकाणी हेळसांड झाल्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे त्यांना वाटले. पण तेथेही डॉक्‍टरांनी त्यांना तपासले नाही. जागा नसल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. अखेर त्यांनी वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर भोईवाड्यातील पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांना रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यांचा आज मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com