भिवंडीत खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

भिवंडी : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीवरून घरी परतत असताना दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात एका 21 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना भिवंडी काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्‍ससमोर घडली. पियुष मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे.

पियुषचा 21 वा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी मित्रांना सोबत घेऊन ठाण्यातील मानपाडा रोडवरील लॉंज- 18 या कॅफे हॉटेलमध्ये गेला होता. मध्य उशिरापर्यंत चाललेली वाढदिवसाची पार्टी उरकल्यानंतर तो मित्राचीच दुचाकी घेऊन घरी येण्यासाठी निघाला होता. पहाटे सव्वातीनच्या सुमारास काल्हेर गावच्या हद्दीतील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्‍ससमोर असताना त्याची दुचाकी खड्ड्यात आदळली.

नियंत्रण सुटून पडल्याने पियुषच्या डोक्‍याला, हनुवटीला व हाताला जबरी मार लागला. त्याला एस. एस. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

web title : Death of two-wheeler rider due to overcrowded pits

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of two-wheeler rider due to overcrowded pits