पाडाळे धरणात मासे मारीसाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू

नंदकिशोर मलबारी
शनिवार, 7 एप्रिल 2018

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील पाडाळे धरणात मासे मारीसाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथील धरणावर पिकनिक व मासे मारी करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागेश देवू ठाकरे असे मृत व्यक्तिचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दूर्घटना घडली. 

पावसाळ्यात माळशेज घाटात दरड कोसण्याचे पकार झाल्यावर पर्यटक या धरणावर मौज- मजा करण्यासाठी येत असल्याने अनेकांना या ठिकाणची माहीती आहे. पावसाळ्यात शनिवार-रविवार पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत आहे. त्यावेळी पोलिस खात्याकडून पोलिसांची नेमणूक केली जाते. मात्र आता उन्हाळ्यात मासे मारी करण्यासाठी येणा-यांना आवर घालण्याची वेळ आली आहे. याच प्रकारातून ही घटना घडली.

Web Title: Death of a young man drowning in the Padale dam