प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेबच हवेत; कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीत सूर

प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेबच हवेत; कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीत सूर


मुंबई - महाविकास आघाडीची घडी नीट बसली असताना आता प्रदेशाध्यक्षपदी नवा नेता नको अशी भूमिका मांडत बहुतांश आमदारांनी हा निर्णय दिल्ली हायकमांडने घ्यावा, अशी भूमिका आज घेतली.विदर्भातील नेत्यांनी मात्र पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नेमावा ही मागणी कायम ठेवली आहे.

राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांनी आज बहुतांश आमदारांची मते ऐकून घेतली असून विधीमंडळ नेतेपदी मात्र नवा नेता नेमला जाण्याची शक्यता आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज जवळपास ८० टक्के आमदारांनी जिल्हा परिषद महापालिका निवडणुका समोर असताना प्रदेशाध्यक्ष बदलला जाणे पक्षासाठी योग्य ठरणार नाही अशी भूमिका मांडली आहे.आज सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत बहुतांश कॉँग्रेस आमदार हजर होते.पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी गेल्या काही महिन्यात पुढे आली आहे.मुंबईचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रदेश संघटनेकडे लक्ष देण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला आहे.आजच्या भेटीगाठी हा त्याच मोहिमेचा भाग आहे.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यावर लगेचच निवडणूक  आणि कोविडची साथ आल्याने त्यांची कारकिर्द अर्ध्यातच संपवणे योग्य ठरणार नाही असेही सांगण्यात आले आहे.

विदर्भात इच्छुकांची गर्दी 
प्रदेशाध्यक्ष बदला ही मागणी रेटणार्या  १० ,१ ५ आमदारांमध्ये विदर्भातील नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले ,ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत ,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ,दुग्धविकासमंत्री सुनिल केदार यांची नावे या ना त्या मार्गाने या पदासाठी चर्चेत आहेत.मात्र यातल्या प्रत्येकाचा दुसर्याच्या नावाला विरोध असल्याने थोरात यांच्या पाठीशी हे नेते उभे आहेत.

The decision of the Congress MLAs preferred Balasaheb Thorat as the State President of the Congress

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com