उल्हासनगरातही 'धारावी पॅटर्न' राबवण्याचा निर्णय; पालिका आयुक्तांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर
Wednesday, 15 July 2020

कोव्हिड यंत्रणेच्या उणिवा, विविध समस्या, यंत्रण सक्षम करण्यासाठी उल्हासनगर पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

 

उल्हासनगर : कोव्हिड यंत्रणेच्या उणिवा, विविध समस्या, यंत्रण सक्षम करण्यासाठी उल्हासनगर पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उल्हासनगरात 'धारावी पॅटर्न' राबवून कोव्हिडवर मात करण्याचा निर्णय घेतला.

Sakal Impact! मुंबईचा फौजदार होण्याचा मार्ग अखेर मोकळा; पदोन्नती लाभार्थींची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार

पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या वर गेली आहे. सरकारी प्रसूतीगृह, कामगार रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांसह अनेक वास्तूंचे 'कोव्हिड-19' रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांना लाखो रुपयांचे अनुदान देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसून, अन्न देखील निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या संदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला. 

मुंबई-ठाण्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर आणि मृत्युदरावर नियंत्रण आणण्याबाबत चर्चा केली. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आणि प्रशासन यांच्या समनव्यातून कोव्हिड -19 मदतकार्यासाठी जवळपास 500 स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली. गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर, टोमिलीझुमॅब या औषधांची खरेदी प्रक्रिया सुरू असून ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटरची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 

.अन्यथा मला भारत-चीन सीमेवर लढायला पाठवा; एसटी चालकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला मदत करावी. लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क दांडगा असतो. त्यामुळे त्यांच्या प्रभागात असलेले संशयित रुग्ण, बाधित झालेले रुग्ण , त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांची माहिती देण्यास पुढाकार घ्यावा.
- डॉ. राजा दयानिधी,
आयुक्त, उल्हासनगर पालिका

-----------------------------------------------

Edited by - Tushar Sonawane 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to implement 'Dharavi Pattern' in Ulhasnagar too; Municipal Commissioner interacts with people's representatives through video conference