esakal | पुढील वर्षी बाप्पा येऊ शकणार नाही म्हणून इतिहासजमा होणाऱ्या वास्तूला कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील वर्षी बाप्पा येऊ शकणार नाही म्हणून इतिहासजमा होणाऱ्या वास्तूला कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न

कांदिवलीत 50 वर्ष जुन्या असलेल्या पोलिस वसाहतीत आजही सर्वधर्म समभावाप्रमाणे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात.

पुढील वर्षी बाप्पा येऊ शकणार नाही म्हणून इतिहासजमा होणाऱ्या वास्तूला कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
भारती बारस्कर

मुंबई, शिवडी : यंदा कोरोनामुळे मुंबईतील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर दिली. मात्र, कांदिवली पोलिस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वसाहतीत पुढील वर्षी उत्सव साजरा होणार नसल्याने देखाव्यात 'मोडकळीस आलेल्या आणि काही दिवसांतच इतिहास जमा' होणाऱ्या पोलिस वसाहती साकारल्या आहेत. या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हेमराज बामणे यांनी सांगितले.

कांदिवलीत 50 वर्ष जुन्या असलेल्या पोलिस वसाहतीत आजही सर्वधर्म समभावाप्रमाणे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात. येथे 11 इमारती असून 128 घरे आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून लवकरच त्या जमीनदोस्त करून तेथे टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत.

मोठी बातमी : मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड

त्यामुळे वसाहतीत पुढील वर्षी गणेशोत्सव साजरा करणे शक्य होणार नसल्याने या इतिहास जमा होणाऱ्या वास्तूला आपल्या कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न कांदिवली पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मंडळाला हा पर्यावरणपुरक देखावा साकारण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला. मंडळाच्या वतीने यंदा रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली. यात आकाश पवार आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली असल्याची माहिती मंडळाचे सचिव मुनिर इनामदार यांनी दिली.

मोठी बातमी : परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

भाविकांना स्पीकरवरून माहिती 

मंडळाने पुट्टे, सनबोर्ड, लाईट, पाण्याचे रंग या साहित्याचा वापर करून इमारती, मंदिर असा हुबेबूब पोलिस वसाहतींचा देखावा साकारला आहे. तसेच, दर्शनासाठी येणारी भाविकांना या वसाहतीचा मागील 50 वर्षांचा इतिहास ध्वनीक्षेपकाद्वारे (स्पिकर) ऐकविण्यात येत आहे.

( संकलन - सुमित बागुल )

old buildings in kandivali are lit up to signify their history read full news

loading image