esakal | कोविडमुळे ओपन हार्ट शस्त्रक्रियांत घट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोविडमुळे ओपन हार्ट शस्त्रक्रियांत घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) काळात पालिका रुग्णालयातील ओपन हार्ट शस्त्रक्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. सायन रुग्णालयात वर्षाला १००, तर नायर रुग्णालयात ६० शस्त्रक्रिया घटल्या असून केईएम रुग्णालयाचीही अशीच परिस्थिती. असल्याची माहिती प्रशासनाकडून आली. रुग्णालय कोविड काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू होत्या.

मात्र छोट्या शस्त्रक्रिया बंद होत्या. रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नव्हते. कोविड रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने मार्गदर्शक सूचनांमध्ये ऑक्सिजन केवळ कोविड रुग्णासाठीच वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. परिणामी अनेक शस्त्रक्रिया बारगळल्या. मागील वर्षी सप्टेंबरपासून शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात अत्यावश्यक शस्त्रक्रियादेखील सुरू झाल्या. तेव्हापासून आजतागायत पालिकेच्या नायर रुग्णालयात २५० ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाल्या असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई : फ्लॅटच्या प्रलोभनाने फसवणाऱ्यास अटक

त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ६० शस्त्रक्रिया कमी झाल्याचे ते सांगतात. पालिकेच्या सायन रुग्णालयात वर्षाकाठी ६०० ओपन हार्ट सर्जरी होत असतात. याचप्रमाणे केईएम रुग्णालयातही सायन रुग्णालयाप्रमाणे ५०० हून अधिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया होतात. गतवर्षी केईएम, नायर व सावन ही प्रमुख रुग्णालये कोविड रुग्णालये असल्याने रुग्णसंख्येत व सर्जरीत घट झाली. सायन रुग्णालयात कोविड काळात सुमारे १०० हून अधिक शस्त्रक्रिया घटल्या असल्याचे + सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

loading image
go to top